Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी

 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर
शिवसेना नगरसेवकाची दादागिरी l पहा LokNews24
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी बैठक

बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन भेटप्रसंगी ते बोलत होते.

दिवंगत देशमुख यांची पत्नी, मुलगी तसेच भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी घटनेबाबत चर्चा करून माहिती घेतली व शासन सर्व प्रकारे या प्रकरणात तपास करून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देईल असे सांगितले. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे ते म्हणाले.

शासनाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो असे श्री. पवार म्हणाले. त्यांनी दिवंगत देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीत आहेत सोबतच न्यायालयीन चौकशी सुरू असून यात कुठलीही त्रुटी राहणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, या घटनेमागे कोणी मास्टरमाईंड असेल तर त्यालाही सोडले जाणार नाही. यावेळी श्री. पवार यांच्या समवेत रमेश आडसकर,डॉ. योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

COMMENTS