Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळवा-शिराळा विधानसभा मतदारसंघ विधान परिषदेपासून वंचित

इस्लामपूर / प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पश्‍चिम महाराष्ट्राला उमेदवारी देण्यात येईल असे वाटले होते. मात्र, भाजपने विधान परिषदेपासून

दिसतोय बदल… होतोय विकास… पोस्टर्सची इस्लामपूरात चर्चा
तहसिलदार सतिश कदम यांनी अर्थशास्त्रात पीएच. डी.
मेकॅनिकल स्वपिंग मशीनमुळे पाचगणीतील रस्ते होणार चकाचक; स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत : पाच मेकॅनिकल मशीन पालिकेत उपलब्ध

इस्लामपूर / प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पश्‍चिम महाराष्ट्राला उमेदवारी देण्यात येईल असे वाटले होते. मात्र, भाजपने विधान परिषदेपासून पश्‍चिम महाराष्ट्राला वंचित ठेवले आहे. भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडीक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने चार जागांसाठी प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे यांची उमेदवारी निश्‍चित केली आहे. यामुळे वाळवा-शिराळा विधानसभा मतदारसंघाला विधान परिषदेपासून वंचित राहावे लागणार आहे.
भाजपने पाचव्या जागेसाठी निर्णय राखून ठेवला होता. पहिल्या यादीत पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, उमा खापरे यांचा समावेश करण्यात आला नव्हता. परंतू पाचव्या जागेसाठी श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपने श्रीकांत भारतीय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील मंत्री जयंत पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणाला थोपवण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडीक, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांचे प्रयत्न आहेत. मंत्री जयंत पाटील यांच्या राजकीय अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी इस्लामपूर किंवा शिराळा मतदारसंघात विधान परिषदेची जागा देणे गरजेचे होते. गेल्या 15 वर्षांपासून मंत्री पाटील यांच्या विरोधात संघर्ष करीत भाजप पक्ष विक्रमभाऊ पाटील यांनी टिकवून ठेवला आहे. भाजपची ताकद वाढविण्यासाठी वाळवा-शिराळा तालुक्यात राहुल महाडीक, सम्राट महाडीक, निशिकांत पाटील यांनी पक्षाची बांधणी घट्ट केली आहे.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर तर सम्राट महाडीक यांनी शिराळा मतदार संघात बंडखोरी केली होती. दोघांनाही 2 नंबरची मते मिळाली. या निवडणुकीत भाजप व शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा नेतृत्व अभाव दिसून आला. मात्र, अपक्ष उमेदवारांचा मतदारसंघातील प्रभाव व नेतृत्व हे भाजप वरिष्ठांच्या डोळ्यात भरले आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे शिराळ्यातून सम्राट महाडीक व इस्लामपूरातून निशिकांत पाटील यांची उमेदवारी असणार अशी चर्चा वाळवा-शिराळा विधानसभा मतदारसंघात आहे.
तरी वाळवा शिराळा तालुक्याला विधान परिषदेत आता संधी मिळाली नसली तरी भविष्यातील वाळवा-शिराळा विधानसभा ही भाजप पक्षच लढविणार असल्याचे सूतोवाच आहे.

COMMENTS