नाशिक ः नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर नाशिक मधील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारची नोटीस बजा

नाशिक ः नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर नाशिक मधील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांना हद्दपारची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांना हाताशी धरून उद्धव ठाकरे गटावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आधी दाखल असणार्या गुन्हाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आल्याचा उल्लेख या नोटीसीमध्ये करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ठाकरेंच्या पदाधिकार्यांना पोलिसांकडून नोटिसा येत असल्याने आता नाशिक लोकसभा मतदारसंघात याची चांगली चर्चा रंगली आहे.
COMMENTS