देवळाली प्रवराच्या त्रिंबकराज स्वामी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवराच्या त्रिंबकराज स्वामी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः दोन वर्षाच्या खंडानंतर वारकर्‍यांना आषाढीचे वारीचे वेध लागले आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी कधी जातो. जाऊ देवाचिया गावा, दे

विकासकामांच्या जोरावर डॉ. सुजय विखे बाजी मारतील ः वसंत लोढा
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेळ प्रसंगी हुतात्मा होऊ ः राजेंद्र लांडगे
शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सत्कार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः दोन वर्षाच्या खंडानंतर वारकर्‍यांना आषाढीचे वारीचे वेध लागले आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी कधी जातो. जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, देवा सांगु सुख दुःख, देव निवारेल भुख अशीच अवस्था वारकर्‍यांची झाली आहे. भूवैकुंठ समजल्या जाणार्‍या पंढरीचा आषाढी सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी यांची पायी दिंडीने शुक्रवारी प्रस्थान केले. रात्रभर झालेल्या वरुण राजाच्या कृपेने पंढरीच्या मार्गावर जणू वारकर्‍यांसाठी पायघड्या टाकल्या असल्याचा भास मनी मानून हाती टाळ, मृदुंग, गळ्यात विना मुखी ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करीत दिंडीने पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी यांची पायी दिंडी सोहळयाचे 21 वे वर्ष असुन शुक्रवारी दिंडीने पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले. राञभर वरुण राजाने हजेरी लावली. प दिंडी सोहळ्यात राहुरी, श्रीरामपूर, राहता, संगमनेर, नगर आदी तालुक्यातील वारकरी सहभागी होतात. श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपुर श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा ह.भ.प. दुर्गाप्रसाद महाराज तिडके, यांच्या अधिपत्याखाली, हभप सुभाष महाराज विधाटे, हभप नामदेव महाराज शास्त्री, हभप बाबा महाराज मोरे, हभप बाळासाहेब महाराज मुसमाडे आदींच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील व प्रितीताई कदम यांच्यासह मुख्याधिकारी अजित निकत, माधवी निकत, माजी नगरसेविका बेबी मुसमाडे, भिमराज मुसमाडे, सुनील भांड, मनिषा भांड आदींच्या हस्ते विविध पुजा करण्यात आल्या. पौराहित्य विजय जोशी,दिनेश जोशी आदीनी केले. देवळाली प्रवरा शहरात प्रदिक्षणा घालुन देवळाली प्रवरा बाजारतळावर दिंडीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने फराळाचे वाटप करुन हिंदु मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवले आहे.
ह.भ.प.गणपत महाराज मुसमाडे (विणेकरी),कै.गुलाबराव कदम,श्रीमती कलावती खुरुद,संध्याताई दादासाहेब शिंदे,चंद्रकला आसाराम ढुस,माजी नगराध्य कै.जगन्नाथ चव्हाण,मुकुंद मुसमाडे, दिवंगत महाराज, वारकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात येवून उपस्थित मान्यवराकडून वारकर्‍यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.
8 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपुर येथे पोहोचणार आहे. 9 जुलै रोजी सकाळी 8 वाजता श्री क्षेत्र पंढरपुर येथे नगर प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपुर येथील श्री त्रिंबकराज स्वामी वारकरी सेवा आश्रम येथे वास्तव्य राहणार आहे. यावेळी सिताराम ढुस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे व वारकर्‍यांचे दिंडीस मदत करणार्‍या भाविकांचे स्वागत करुन आभार मानले. गेल्या 21 वर्षा पासुन दिंडीची धुरा सांभाळली. यापुढील वर्षा पासुन तरुणांच्या हातात दिंडी धुरा देत जड अंतकरणाने वारकर्‍यांचा निरोप घेतो असे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहु लागले. यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरुद, प्रिती कदम, संगीता चव्हाण, हभप गिताताई धसाळ, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, सोपानराव मुसमाडे, डॉ. अशोक मुसमाडे, हभप संपत मुसमाडे, विलास महाराज कोतकर, आबासाहेब महाराज कोळसे, राजेंद्र चव्हाण, कांता कदम, आण्णासाहेब मोरे, नानासाहेब शिरसाठ, निवृत्ती होले, हभप बाबुराव गवळी, रामभाऊ अटक, बबनराव पटारे, सुदाम भांड, रविंद्र ढुस, सुधीर टिक्कल, सोपान शेटे, संतोष चव्हाण, सोपान भांड, प्रोमद कदम, संजय बर्डे, मंजाबापू वरखडे, सुधाकर कराळे, रफीख शेख, राजेंद्र ढुस, बापूसाहेब कोतकर, आण्णासाहेब चोथे, आदी उपस्थित होते.

वारकर्‍यांसमोर दुष्काळाच्या पायघड्या!
बळीराजा पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यास निघण्यापुर्वी वेळेवर पाऊस पडला की पेरण्या करुन शिवार हिरवागार दिसत असायचा शिवारातील हिरवागार शालू वारकर्‍यांना शुभेच्छा देतो असा भास वारकर्‍यांना होत असे.यावर्षी दुष्काळाच्या पायघड्यांवरुनच जाण्याची वेळ आली असल्याचे वारकरी व ह.भ.प दुर्गाप्रसाद तिडके यांनी सांगितले.

COMMENTS