Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र भाळवणी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

भाळवणी : सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र भाळवणी ते श्रीक्षेत्र पंढरपूर दिंडीचे येथील श्री नागेश्‍वर मंदिराच्या प्रांगणातून नुकतेच प्रस्थान झाले असून द

जलयुक्तच्या कारवाईला चौकशी अहवालाची प्रतीक्षा
पढेगाव ग्रामसभेत मांडला प्रशासनाच्या उणिवांचा लेखाजोखा
शिवसेना पदाधिकार्‍याच्या भावास ठार मारण्याची धमकी

भाळवणी : सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र भाळवणी ते श्रीक्षेत्र पंढरपूर दिंडीचे येथील श्री नागेश्‍वर मंदिराच्या प्रांगणातून नुकतेच प्रस्थान झाले असून दिंडीचे हे 22 वे वर्ष आहे. वै.ह.भ.प. बबन महाराज पायमोडे व ह.भ.प. ब्रम्हचारी दत्तदिगंबर महाराज शहापूर यांच्या आशिर्वादाने आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भाळवणी येथून विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात दिंडीचे प्रस्थान झाले.
यावेळी ह.भ.प. राधाकृष्ण शिंदे महाराज, बाबासाहेब महाराज दळवी, हिराबाई महाराज जाधव, सरपंच लिलाबाई रोहोकले, मंजाभाऊ चेमटे, संतोष पारख, अरुण कपाळे, बाबूशेठ रोहोकले, संदीप कपाळे, भानुदास तरटे, सूर्यभान रोहोकले, झुंबर रोहोकले, विश्‍वनाथ रोहोकले, ज्ञानदेव रोहोकले, ज्ञानदेव कुंडलिक, सदाशिव पळसकर, गंगाधर रोहोकले, नागनाथ रोहोकले, आप्पा भुजबळ, संतोष रोहोकले मेजर, भाऊसाहेब रोहोकले मेजर, गिताराम रोहोकले, सचिन रोहोकले, आदींसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडीचा मुक्काम शनिवार 6 रोजी नगर येथील जाधव लॉन येथे असून पुढील मुक्काम दि.7 रोजी जि.प. शाळा वाटेफळ, 8 घोगरगाव, 9 रोजी बाभुळगाव, 10 चापडगाव, 11 कमलादेवी मंदिर करमाळा, दि.12 मार्केट यार्ड जेऊर, दि.13 जि.प. शाळा कंधार, 14 जि.प. शाळा परिते व दि.15,16 पंढरपूर असा राहणार असून मोठ्या संख्येने भाविकांनी दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन दिंडी पंच कमिटी तसेच हनुमान प्रासादिक भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS