चांदवड : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पौष वारी निमित्ताने गेल्या २७ वर्षांपासून चालत असलेला श्री क्षेत्र तिसगांव,भोयेगांव,जोप
चांदवड : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पौष वारी निमित्ताने गेल्या २७ वर्षांपासून चालत असलेला श्री क्षेत्र तिसगांव,भोयेगांव,जोपुळ ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पौष वारी निमित्ताने रामायणाचार्य ह.भ.प.मधुकर महाराज जाधव व ह.भ.प.शिवाजी महाराज वाघ,ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे तिसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तिसगांव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने चालत असणारा भव्य पायी दिंडी सोहळा आज संत शिरोमणी श्रीसावता माळी महाराज मंदिरात पूजन करून सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले.यावेळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे, व समवेत भजनी मंडळ ह.भ.प.बंडू महाराज गांगुर्डे,ह.भ.प.गंगाधर महाराज गांगुर्डे,राजेंद्र महाराज गांगुर्डे (चोपदार),अनिकेत माऊली गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे,बाजीराव गांगुर्डे,रतन गांगुर्डे,विकास गांगुर्डे, दिपक गांगुर्डे,वाळूबा माळी,भारत गांगुर्डे,अलका गांगुर्डे शैला खैरे,हिराबाई गांगुर्डे,कमल बागुल,सरुबाई गांगुर्डे,विमल सोनवणे,लताबाई गांगुर्डे, इंदूबाई गांगुर्डे इतर महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसे या वर्षी वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू श्रीगुरु श्री निवृत्तिनाथ महाराज यांचे सप्तशतकोत्तरी जयंती सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे बरीच वारकरी उपस्थिती आहे.
COMMENTS