खरंतर भारतासारख्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात येऊन 74 वर्षांचा कालावधी लोटला आहे. भारताला लोकशाही ही आयती मिळाली आहे, त्यासाठी आपल्याला संघर्ष
खरंतर भारतासारख्या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात येऊन 74 वर्षांचा कालावधी लोटला आहे. भारताला लोकशाही ही आयती मिळाली आहे, त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागलेला नाही. अमेरिका किंवा फ्रान्समध्ये ज्याप्रकारे लोकशाहीसाठी क्रांती पुकारण्यात आली ती क्रांती भारतात झालेली नाही. भारतीयांना इंग्रजांविरूद्ध दिलेला लढा हा स्वातंत्र्यलढा होता. तो स्वातंत्र्यासाठी होता, लोकशाहीसाठी नव्हे. त्यामुळे आपल्याला लोकशाही न मागता तत्कालीन भारतीय नेत्यांनी दिलेली देणगी आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बनविण्यात आलेल्या संविधान सभेने संपूर्ण विचारांती आणि भारत देशामध्ये वास्तव्य करत असलेले विविध जाती, धर्मांचे लोक विचारात घेऊन संसदीय लोकशाही प्रणाली आपण स्वीकारली आहे. खरंतर लोकशाही ही आपल्याला अपघाताने मिळाली असली तरी, आपण अजूनही लोकशाही पूर्णपणे आत्मसात करू शकलो नाही. आज देशभरात लोकशाहीच्या उत्सवाचा पाचवा टप्प्यातील 49 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे.
हे या राष्ट्रीय मतदार दिवसाने अधोरेखित केलेले आहे. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हयात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रम ही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेले आहेत. गांव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्याह निद्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी. भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस ’राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यांचा प्रमुख उद्देश मतदानाप्रती जागरूकता निर्माण करणे हा आहे. त्यामुळे मतदानाप्रती प्रत्येक पात्र नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. हा हक्क बजावलाच पाहिजे. खरंतर मतदान करण्याची सक्ती करावी असा देखील मतप्रवाह दिसून येत असला तरी, तसा कायदा आपण केला नाही. त्यामुळे मतदान करण्याची जबाबदारी आपण सुज्ञ नागरिकांवर सोपवली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हक्कांप्रती सजग राहून मतदान करण्याची गरज आहे. खरंतर यानिमित्ताने भारतातील प्रत्येक मतदान हा विकासाच्या मुद्याने किंवा लोकशाहीचा विचार करून मतदान करतो का, या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी येते. खरंतर देशातील प्रत्येक व्यक्तीने धर्म, जात, पात, आपल्या भावना घराच्या आत ठेवण्याची खरी गरज आहे. घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर केवळ राष्ट्राचा विचार करणे आवश्यक आहे. त्यातूनच भारतीय लोकशाही प्रगल्भ होईल. जोपर्यंत भारतीय लोकशाही राष्ट्रासाठी विचार करत नाही, तोपर्यंत ही लोकशाही प्रगल्भ होणे अशक्य आहे. कारण आजमितीस राष्ट्रहिताला जातीचा, धर्माचा मुलामा देण्याचे काम धर्मांध शक्तीकडून सुरू आहे. देशामध्ये बहुसंख्याक हिंदू समाज अजूनही या समाजाला इतर समाजाची भीती असल्याचा धाक दाखवण्यात येतो, आणि परिणामी हिंदू समाजाला काही विघातक शक्तींकडून धोका असल्याचा समज पसरवण्यात येतो. वास्तविक पाहता या देशामध्ये कायदा असून, देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो. शिवाय लोकशाही असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही.
COMMENTS