Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरात दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी : दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक

विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक
शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप

कोल्हापूर / प्रतिनिधी : दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांच्याकडे केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविलेला असताना परीक्षा ऑफलाईन कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला.
निवेदनात म्हटले आहे, दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षाही अर्धवट अवस्थेत झाल्या. यंदा अभ्यासक्रम 65 टक्के ऑनलाईन व 10 टक्केऑफलाईन पध्दतीने पूर्ण झाला. यातही जिल्ह्यातील नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती पाहता ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना शिकवून झाले आहे, असे रेकॉर्ड उपलब्ध असेल, असे वाटत नाही. 4 ऑक्टोंबर 2021 पासून दहावी व बारावीचे ऑफलाईन शिक्षण सुरू झाले.
10 टक्केऑफलाईन अभ्यासक्रमाच्या आधारे ऑफलाईन परीक्षा घेणार का? जर 65 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असताना ऑफलाईन परीक्षेचा अट्टहास कशासाठी? 75 पैकी 65 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असताना परीक्षा ऑनलाईन का होऊ शकत नाहीत? कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षण विभाग घेणार आहे का? त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत बोलताना उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्रुक्ष सत्यवान सोनवणे यांनी आपले निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठवले जाईल, असे सांगितले.

COMMENTS