Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ध्वजारोहणास विरोध करणार्‍या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण / प्रतिनिधी : महावितरणच्या शाखा विडणी या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या होणार्‍या ध्वजारोहण सोहळ्यास मनाई करणार्‍या फलटण ग्रामीण अत

धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात
सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. राजाराम माने
शहीद जवान वैभव भोईटे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फलटण / प्रतिनिधी : महावितरणच्या शाखा विडणी या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या होणार्‍या ध्वजारोहण सोहळ्यास मनाई करणार्‍या फलटण ग्रामीण अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत खिलारे यांच्यावर ध्वजसंहिता कायदा व राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
देशाचा अभिमान प्रत्येकाला असतो भारतीयांना आपल्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे. मात्र, या अभिमानामध्ये व अधिकारामुळे कधी कधी तिरंग्याचा अपमान होतो. अशीच घटना विडणी गावात घडली असून 26 जानेवारी रोजी मौजे विडणी येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात गेली 30 वर्षांपासून ध्वजारोहण सोहळा होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र, यावर्षी याठिकाणी ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला नाही. ही बाब लक्षात आल्यावर याबद्दल विडणी शाखेच्या वरिष्ठ वायरमन संतोष जिंतूरकर यांना फोनवरून ध्वजारोहण सोहळा का केला नाही, असे एका ग्रामस्थांने विचारले असता जिंतूरकर यांनी कार्यालयीन भेटीकरिता आलेल्या फलटण ग्रामीण अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत खिलारे यांनी ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्याकरिता जिंतूरकर हे ध्वज देत असताना ध्वज देऊ नका, असे सांगून ध्वज देण्यास खिलारे यांनी मनाई केली. तसेच ध्वजारोहण करू नका असे सांगितले. यामुळे 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन सोहळा होऊ शकला नाही. अशी असल्याची माहिती फोनद्वारे दिली. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यास मनाई करणार्‍या अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत खिलारे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत भारतीय ध्वजसंहिता 2002, भारतीय ध्वजसंहिता 2006 नुसार अनेक तरतुदी असून राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत ध्वजाचा अपमान व अवमान करणार्‍या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत जेल किंवा दंडात्मक शिक्षा केली जाऊ शकते. अनेक वर्षाची परंपरा मोडीत काढणार्‍या अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता या प्रकरणी कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
ध्वजारोहण सोहळा करण्यास ध्वज न देणार्‍या व ध्वजारोहण सोहळा करण्यास मनाई करणार्‍या फलटण ग्रामीणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत खिलारे यांच्यावर जबाबदार अधिकार्‍यांनी कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा. याबाबत सविस्तर तक्रार दाखल करणार आहे.
नंदकुमार जगताप (सामाजिक कार्यकर्ते, विडणी)

COMMENTS