Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासाफाटा, सुरेशनगर, हंडीनिमगाव परिसराचा वीज पुरवठा नेवासा सबस्टेशनला जोडण्याची मागणी

नेवासाफाटा ः नेवासा तालुक्यातील (मुकींदपूर) नेवासाफाटा, सुरेशनगर, हंडीनिमगाव या परिसराचा वीज पुरवठा नेवासा सबस्टेशनला जोडा याबाबत वरील तिन्ही ही

जामखेड नगरपरिषदेकडून दिव्यांग निधी वाटप
लोकशाही पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप दरंदले
पञकार संघाच्या वतीने कोपरगाव येथे कोविड योध्दा रक्तदान शिबीर

नेवासाफाटा ः नेवासा तालुक्यातील (मुकींदपूर) नेवासाफाटा, सुरेशनगर, हंडीनिमगाव या परिसराचा वीज पुरवठा नेवासा सबस्टेशनला जोडा याबाबत वरील तिन्ही ही ग्रामपंचायतने ठराव करून नेवासा उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे, मागणीची दखल घ्या अन्यथा नेवासाफाटा येथे रास्तारोको व जेलभरो आंदोलन करु असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
   याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सुरेशनगर, नेवासाफाटा, हंडीनिमगाव येथील संयुक्तपणे काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरील गावांचा  विजपुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला असून एकही दिवस व रात्र विज पुरवठा सुरळीत होत नाही. वायरमन व संबधीत विभागाचे अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधुन विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत कळवूनही अनेक महिन्यापासुन विज पुरवठा सुरळीत मिळत नाही. व अधिकारी व वायरमन उडवा-उडवीचे उत्तरे देतात. सुरेशनगर,नेवासाफाटा( मुकींदपूर)हंडीनिमगाव परिसराचा विद्युत पुरवठा भानसहिवरा सबस्टेशनला जोडलेला आहे. तरी तो विज पुरवठा नेवासा सबस्टेशन मार्फत तात्काळ जोडण्यात यावा अन्यथा 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वा. नेवासा फाटा येथे गावकर्‍यांच्या वतीने रस्तारोको आंदोलन व जलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. पुढील होणार्‍या सर्व परिणामाची जबाबदारी आपणावर राहील यांची दखल घ्यावी असे ही निवेदनात स्पष्ट केले आहे. सदर निवेदनावर सुरेशनगरचे, हंडीनिमगाव, मुकींदपूर नेवासाफाटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या सहया आहेत.

COMMENTS