Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेढ्यातील व्यापार्‍यांकडून फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी

मेढा / प्रतिनिधी : जावली तालुक्यातील मेढा येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले असून रस्त्याच्या कडेला गटारे व त्यावर फुटपाथची व्यवस्था करण्यात

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24
बारावीतील विद्यार्थ्याची वाघोली येथे आत्महत्या
फलटणमध्ये पुण्याच्या व्यापार्‍याला भरदिवसा लुटले

मेढा / प्रतिनिधी : जावली तालुक्यातील मेढा येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले असून रस्त्याच्या कडेला गटारे व त्यावर फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. फुटपाथवर भाजी विक्रेते, स्टेशनरी विक्रेते, मासळी विक्रेते, चर्मकार, बांगडी विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. विनापरवाना आसणारी ही दुकाने हटवण्यात यावीत, अशी मागणी मेढ्यातील व्यापार्‍यांनी निवेदनाद्वारे जावळीचे तहसीलदार व नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.
तहसीलदार राजेंद्र पोळ यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र वीर, दत्तात्रय पवार, अनिल खटावकर, अजित खटावकर, चंद्रशेखर गाडवे, भुपेश गाडवे, प्रविण गाडवे, नारायण पिलके, मिलन मुळे, धनंजय पवार, विनायक पवार, रवींद्र शिंदे, अविनाश कारंजकर, उदय कारंजरकर, रमेश जवळ, विश्‍वनाथ धनावडे, एस. एम. पार्टे, प्रकाश परांजपे यांची उपस्थिती होती.
मेढा शहरातून जात असलेल्या मेढा-महाबळेश्‍वर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी झाले असून रस्त्यालगत गटारांची व्यवस्था करून त्यावर पादचार्‍यांसाठी फुटपाथची व्यवस्था करण्यात आली आहे. या फुटपाथवर छोटी दुकाने मांडल्याने
अतिक्रमण झाले आहे. यामुळे मिळकतधारक दुकानदारांची दुकाने झाकून जात आहेत. याठिकणी खरेदी करताना ग्राहक मुख्य रस्त्यावर उभे राहतात याचा वाहतुकीला अडथळा होत आहे.
मेढा नगरपंचायतीने सन 2021 मध्ये याबाबत ठराव करून मेढा मुख्य बाजार चौक ते वेण्णा चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंगसाठी रस्त्याचा भाग आरक्षित केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी. रस्त्याकडेला असणारी बेकायदेशीर व विनापरवाना दुकाने हटविण्यात यावीत. अशा मागणीचे निवेदन व्यापार्‍यांनी जावळीचे तहसीलदार, नगरपंचायत मेढा, पोलीस ठाणे व बांधकाम विभागास दिले आहे.

COMMENTS