Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालेपीर भागातील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी

खमरोद्दीन यांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

बीड प्रतिनिधी - बालेपीर भागातील वैशिष्ठ्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून करण्यात आलेल्या रस्ते व नाल्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले अस

या दिवशी रिलीज होणार ‘आदिपुरुष’चा जबरदस्त टीझर
महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२२ ची ६.९३ टक्के दराने परतफेड
राजकीय पक्षांची चिन्हेही गोठवली जावीत…राळेगण सिद्धीच्या बैठकीत ठराव

बीड प्रतिनिधी – बालेपीर भागातील वैशिष्ठ्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून करण्यात आलेल्या रस्ते व नाल्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर कामाची दखल न घेण्यात आल्याने बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष महंमद खमरोद्दीन यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला असून येत्या 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
खमरोद्दीन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालेपीर येथील प्रभाग क्र.11 मधील रस्ता व नाली बांधकाम करणेसाठी शासन मार्फत निधी मंजूर करण्यात आला होता. सदर काम योग्य न करण्यात आल्याने सुरुवाती पासून होत असलेल्या रस्ते व नाली कामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा बाबत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या निदर्शनास वेळो-वेळी आणून दिले. परंतु या विभागाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सदर काम अंदाजपत्रकातील बाबी प्रमाणे रस्ता व नाली बांधकाम करण्यात आले नसल्यामुळे सदर निकृष्ट कामाची चौकशी करण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक  उपोषण करुन ही सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची दखल घेण्यात न आल्याने सदर रस्ते व नाल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन संबंधितावर कठोर कारवाई करावी या मागणी करीता दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा गंभीर इशारा शहर अध्यक्ष महमद खमरोद्दीन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

COMMENTS