Homeताज्या बातम्यादेश

राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा

लाल किल्ला व चांदणी चौक परिसरात सुरक्षा वाढवली नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला लक्ष्य करण्याच्या संभाव्य दहशतवादी कटाबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या युवांशी साधणार संवाद
थंडी आणि धुक्यामुळे रेल्वे गाड्यांना विलंब
बिहारमध्ये होणार भाजपचा प्रथमच मुख्यमंत्री ?नितीश कुमारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

लाल किल्ला व चांदणी चौक परिसरात सुरक्षा वाढवली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला लक्ष्य करण्याच्या संभाव्य दहशतवादी कटाबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी गंभीर इशारा दिला आहे. गुप्त माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेकडून दिल्लीतील संवेदनशील व ऐतिहासिक स्थळांवर हल्ल्याची योजना आखली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः लाल किल्ला परिसर तसेच चांदणी चौक येथील एका प्रमुख मंदिराला लक्ष्य केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
गुप्तचर विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, स्फोटकांचा वापर करून गर्दीच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा कट असू शकतो. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या धार्मिक, ऐतिहासिक व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. लाल किल्ला परिसरात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असून पायदळ गस्तही वाढवण्यात आली आहे. चांदणी चौकातील अरुंद रस्ते आणि मोठी वर्दळ लक्षात घेता तेथे विशेष खबरदारी घेतली जात आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे 6 फेब्रुवारी रोजी मशिदीत झालेल्या स्फोटानंतर सूडभावनेतून भारतात कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ दिल्लीच नव्हे, तर देशातील इतर प्रमुख शहरांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही प्रमुख मंदिरांवरही विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलीस यांच्यात सातत्याने समन्वय सुरू आहे. ठिकठिकाणी चित्रफीत नोंद प्रणालीद्वारे देखरेख वाढवण्यात आली आहे. स्फोटक शोध पथके, श्‍वान पथके आणि जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या बाजारपेठा, मेट्रो स्थानके, बस स्थानके आणि पर्यटनस्थळांवरही अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटाची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन यावेळी अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे. त्या घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्या अनुभवातून धडा घेत यंत्रणा अधिक सजग राहिल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
चौकट—–
संशयास्पद वस्तू आढळल्यास
तात्काळ कळवण्याचे पोलिसांचे आवाहन
सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू, वाहन किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा आपत्कालीन सेवांना कळवावे, असे सांगण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS