Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील

कराड / प्रतिनिधी : लोकप्रतिनिधींनी निवडणूकीपुरते केवळ राजकारणाचा विचार करावा. एकदा निवडूण आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. खा. श्रीनिवास

प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया
बसस्थानकात एसटीच्या चालकाकडून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
कृष्णा बँकेच्या चेअरमनपदी डॉ. अतुल भोसले यांची बिनविरोध; व्हाईस चेअरमनपदी दामाजी मोरे यांची निवड

कराड / प्रतिनिधी : लोकप्रतिनिधींनी निवडणूकीपुरते केवळ राजकारणाचा विचार करावा. एकदा निवडूण आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. खा. श्रीनिवास पाटील यांनी सन 1999 ते 2009 या काळात राजकारण विरहीत विकासकामे केली. त्यानंतर 10 वर्षांनी 2019 मध्ये पक्षाने निवडणूक लढण्यास सांगितले, तेंव्हा विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा पराभव करणे शक्य झाले असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता लगावला.
साकुर्डी (ता.कराड) येथे खासदार श्रीनिवास पाटील प्रयत्नातून मंजूर झालेल्या साकव पूल बांधणे कामाचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी साकुर्डी गावचे सरपंच अ‍ॅड. विश्‍वासराव निकम, उपसरपंच सुहास जाधव, माजी उपसरपंच निवासराव जाधव, मनोज शिंदे, लक्ष्मण शिंदे, शिवाजीराव निकम, कराड पंचयात समितीचे माजी सदस्य विजयराव चव्हाण, साहेबराव गायकवाड, सुहास गायकवाड, अ‍ॅड. विजयसिंह पाटील, मारूल हवेलीचे सरपंच अशोक मगरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सारंग पाटील म्हणाले, खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कधीच मतांचा व विरोधकांचा विचार केला नाही. निवडणूक लढविताना एका पक्षांचा विचार असतो. त्यामुळे तेथे पक्षांची बाजू घ्यावी लागते. परंतू त्यानंतर लोकप्रतिनिधी सर्वांचा असतो. राष्ट्रवादी पक्षाने सन 2009 मध्ये काहीही कारण नसताना थांबायला सांगितले, साहेब थांबले. त्यानंतर सन 2019 मध्ये अचानक निवडणूक लढण्यास सांगितले. तेंव्हा या 80 वर्षाचा योध्दा पक्षासाठी रिंगणात उतरला. नेहमी विकास कामांचा ध्यास आणि लोकांचा विचार यामुळे तगड्या उमेदवाराला धूळ चारण्यात खा. श्रीनिवास पाटील साहेब यशस्वी झाले.
यावेळी सरपंच अ‍ॅड. विश्‍वासराव निकम यांनी प्रास्ताविक केले. निवासराव शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अ‍ॅड. विकास निकम यांनी केले.

COMMENTS