Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांधींबाबत बुध्दीभेदाचे प्रयत्न हाणून पाडा : निरंजन टकले 

कर्जत प्रतिनिधी -  'सत्य, लोकशाही, प्रेम,समता,बंधुता ही श्वाश्वत मुल्ये आहेत, चिरंतन मुल्ये आहेत.  संघ, सावरकरवादी आणि रा. स्व. संघाला द्वेष वाढव

पंचायत समिती पदाधिकारी अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा
अहिल्यानगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनाच्या तयारीला वेग

कर्जत प्रतिनिधी –  ‘सत्य, लोकशाही, प्रेम,समता,बंधुता ही श्वाश्वत मुल्ये आहेत, चिरंतन मुल्ये आहेत.  संघ, सावरकरवादी आणि रा. स्व. संघाला द्वेष वाढवून ही शाश्वत मूल्ये नष्ट करायची आहेत. द्वेषाचे हे राजकारण फेकून द्यायचे असेल तर  गांधींजींप्रमाणे चिरंतन, शाश्वत मुल्यांचा आक्रमक प्रसार करावा लागेल ‘, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले.’कर्नाटक मधील युवापिढीने द्वेषाचे राजकारण फेकून दिले. पुढील पिढी लोकशाहीमधेच नांदावी, असे वाटत असेल तर आपण या पिढीत प्रबोधनाचा आग्रह धरला पाहिजे. संघटन, विचार प्रसाराची यंत्रणा तयार करावी लागणार आहे. सत्तेविरुद्ध  सत्याचा विजय होणारच आहे ‘, असेही ते  म्हणाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ‘ गांधी दर्शन   शिबिर ‘ या पुण्यातील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्रा. श्रीरंजन आवटे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तथा युवक क्रांती दल संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे होते. अन्वर राजन, डॉ. उर्मिला सप्तर्षी,  प्रशांत कोठडिया, संदीप बर्वे, अप्पा अनारसे, सुदर्शन चखाले ,सचिन पांडुळे , अस्लम बागवान, प्रसाद झावरे-पाटील व आदी उपस्थित होते.

रा. स्व. संघाकडून गांधींबद्दलचा अपप्रचार : डॉ.कुमार सप्तर्षी – डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ संघाला पुराणकालीन व्यवस्था आणायची आहे. यज्ञ संस्कृतीचा ब्राह्मण वर्चस्ववाद आणायचा आहे. व्यक्तीचा मानसिक दृष्टया ताबा घेऊन ते प्रसार करतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नको आहेत . संघाने अपप्रचार करून गांधीजींची चुकीची प्रतिमा  पसरवली  आहे. खरे गांधी विचारांनी अजून जिवंत आहेत. खरा गांधी झाकोळून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसही  गांधी विचार पुढे नेण्यात अपयशी ठरली.गांधी हे शास्त्र आहे. सार्वजनिक जीवनात ते उपयुक्त आहे, ज्यांनी सत्याग्रहाची कास धरली, त्यांना अपयश येत नाही. सत्याला सामर्थ्याची जोड दिली तरच विजय होतो . लोक उभे राहिले की द्वेषवादी वृतीचा पराभव होतो, हे कर्नाटकात दिसले आहे’, असेही डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले.

COMMENTS