चकलांबा प्रतिनिधी :- गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील शेतकर्यांसमोर पाण्याचे अनेक प्रश्न उभे राहिले. अनेक प्रश्नांना,अडचणींना सामना देत कसेबसे
चकलांबा प्रतिनिधी :- गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील शेतकर्यांसमोर पाण्याचे अनेक प्रश्न उभे राहिले. अनेक प्रश्नांना,अडचणींना सामना देत कसेबसे सावरून माजी आ.अमरसिंह पंडीत यांच्या समोर शेतकर्यांनी बंधारे खोलीकरनाचा , सरळीकरण विस्तारीकरण चा प्रस्ताव मांडल्यानंतर शेतकर्यांच्या मदतीला नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन संस्था व मा.आ.अमरसिंह पंडीत यांच्या शारदा प्रतिष्ठाण च्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार रोजी बंधारे सरळीकरन, खोलीकरनाचा शुभारंभ मा.जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत, अप्पर उपजिल्हाधिकारी पाटील साहेब तहसीलदार सचिन खाडे,नाम फाउंडेशन राज्य समन्वयक शेलके साहेब, कृषी भूषण शिवराम घोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
नाम फाउंडेशन व शारदा प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन चकलांबा येथिल बंधारे खोलीकरण व विस्तारीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ गुरूवार दि,6 रोजी सकाळी करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच बंधारे खोलीकरण अभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पाण्याने वाहनारे नदी-नाले बंधारे काही दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे.चकलांबा येथिल सर्व बंधारे खोलीकरण व विस्तारीकरण सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेवून माजी आ.अमरसिंह पंडीत, माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांनी चकलांबा गावातील सर्व बंधारे खोलीकरणाचा व विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडीत, अप्पर उपजिल्हाधिकारी पाटील साहेब, नाम फाउंडेशन राज्य समन्वयक शेलके साहेब,तहसीलदार सचिन खाडे,राजा भाऊ शेलके ,कूषी भुषण शिवराम घोडके,नाम फाउंडेशन यागेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी चौधर साहेब, मा पंचायत समिती सदस्य शेख तय्यब, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ विजयकुमार घाडगे , मा संरपच मारुती घुमरे,मा ग्रामपंचायत सदस्य मदन खेडकर, भाऊसाहेब घाडगे, शेख पाशु भाई, कमलाकर खेडकर, आदींसह नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी, शेतकरी व रा.कॉ.पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS