Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोळगावथडी सोसायटीच्या अध्यक्षपदी दीपक राऊत

उपाध्यक्षपदी शिवाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील कोळगावथडी प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक पुंजाजी राऊत तर उपाध्यक्षपदी शिवाजी

अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकुर रुजू
लपूनछपून फिरणारे पाच तडीपार झाले अखेर जेरबंद…
कोपरगावात ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील कोळगावथडी प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक पुंजाजी राऊत तर उपाध्यक्षपदी शिवाजी लक्ष्मण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड एकमताने करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) नामदेवराव ठोंबळ, आय. आय. शेख यांनी काम पाहिले. याप्रसंगी संस्थेचे संचालक पुंजाजी चिमाजी राऊत, मार्गदर्शक नानासाहेब जंगलीराम पंडोरे, संचालक रामदास किसन वाकचौरे, किसन चिमाजी राऊत, कांताराम बाबुराव लुटे, राहुल पुंजाजी राऊत, कारभारी सावळेराम कोळपे, उत्तम बाळाजी मेहरखांब, तुषार किसन राऊत, विमल माणिकराव वाकचौरे, शुभांगिनी राहुल राऊत, कृष्णा रामप्रसाद निंबाळकर, सचिव शांताराम सुकदेव कदम आदी  प्रमुख उपस्थित होते.  संस्थापक पुंजाजी चिमाजी राऊत यांनी आभार मानले.

COMMENTS