Homeताज्या बातम्याक्रीडा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून दीपक चहरची माघार ?

भारतीय संघ येत्या 10 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध तीन सामन्यांची T 20 मालिका खेळणार असून वेगवान गोलंदाज दीपक चाहर चा या दौऱ्यात समावे

महेंद्रसिंग धोनीने चांद्रयान-3 च्या लँडिंगचे केले खास सेलिब्रेशन
पाक चाहत्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून रोखले
शामगाव येथे लोकसहभागातून महिला कुस्ती संकुल

भारतीय संघ येत्या 10 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध तीन सामन्यांची T 20 मालिका खेळणार असून वेगवान गोलंदाज दीपक चाहर चा या दौऱ्यात समावेश करण्यात आला असून दीपक हा सामना खेळणार की नाही हा मोठा प्रश्न उदभवला आहे. त्याचे कारण असे की दीपक चाहरच्या वडिलांची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे की नाही याचा निर्णय मी नंतर घेईन असे भारतीय संघाचा क्रिकेटपटू दीपक चहरने म्हटले आहे. आत्तासाठी, तो गेम खेळण्यापूर्वी आपली कर्तव्ये पार पाडेल. दीपकचे वडील लोकेंद्र चहर यांना नुकताच ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यांना मिथराज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. दीपक यांना वडिलांच्या तब्बेतीची माहिती मिळाल्यावर ते तातडीनं घरी परतले. येत्या 10 डिसेंबरला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T-20 सामना खेळणार आहे.

वडिलांची काळजी घेत असलेल्या दीपक चहर यांची  व्हिडिओ कॉलद्वारे भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. जोपर्यंत वडिलांची प्रकृती धोक्याबाहेर होत नाही तोपर्यंत त्यांना सराव करता येणार नाही, अशी विनंती भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल सर (राहुल द्रविड) आणि निवडकर्त्यांशी केली. रुग्णालयात चांगले उपचार दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.असे चाहर म्हणाले.

2 डिसेंबर रोजी दीपकचे वडील लोकेंद्र चहर यांना मेंदूचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते अलिगडमध्ये आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलच्या संपर्कात आहे. त्याला दोन-तीन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त समजताच दीपक चहर 3 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना सोडून अलिगढला  पोहोचले

COMMENTS