Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा ः आदिनाथ देवढे

पाथर्डी ः राज्य मंत्रिमंडळाने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यात गंभीर तर 16 तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला.नंतर उर्

दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप
…त्यांनी नगरचा पांढरीपूल घाटच मानला माऊंट एव्हरेस्ट ; 38 तासात तब्बल 72 वेळा केली सायकलवर चढ-उतार, चौघांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

पाथर्डी ः राज्य मंत्रिमंडळाने 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करून 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यात गंभीर तर 16 तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला.नंतर उर्वरीत मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करत सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील 96 मंडळाचा दुष्काळसदृश यादीत समावेश केला.पाथर्डी आणी शेवगाव तालुक्यात जी मंडळे गंभीर दुष्काळी आहेत त्यांनाच या यादीतून वगळल्याने सरकार शेतकर्‍यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल करणारे हे निकष बाजूला ठेऊन पाथर्डी व शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा या मागणी दि.16 नोहें रोजी प्रांत कार्यालय पाथर्डी आणी तहसील कार्यालय पाथर्डी यांना निवेदन देण्यात आले.आमच्या मागण्या मान्य न झाल्यास  मोठे आंदोलन करू असा इशारा आदिनाथ देवढे यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
        यावेळी आदिनाथ देवढे यांच्यासह अक्षय वायकर, बापूराव महारनोर, रामनाथ वाकचौरे, जालिंदर उबाळे,कल्याण देवढे,मुक्तार शेख,शिवनाथ देवढे,गणेश वाकचौरे, भगवान सोनवणे, एकनाथ वाकचौरे, प्रेमचंद खंडागळे, सावळेराम चितळकर ,वसंत देवढे, आदि शेतकरी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यातील 5 व शेवगाव तालुक्यातील 6 मंडळे ही  शासनाने दुष्काळ सदृश मंडळे म्हणून निवडली.परंतु या दोन्ही तालुक्यातील निवडली न गेलेली मंडळे ही दुष्काळीच आहेत. त्या मंडळांसहीत निवडल्या गेलेल्या मंडळांना दुष्काळ सदृश असे न म्हणता दोन्ही तालुक्यातील सर्वच मंडळांची निवड गंभीर दुष्काळी यादीत करण्यात यावी. तिसगावसहीत पाथर्डी पूर्व भागातील अकोला, कोरडगाव आणी खरवंडी  ही मंडळे या यादीतून वगळले आहेत. ही सर्वच मंडळे चालू वर्षी पावसाला मुकली आहेत. शासनाच्या सदोष सर्वेक्षण पध्दतीच्या चुकीच्या नोंदींमुळे दुष्काळी यादीतून हुकलेल्या मंडळांवर खूप अन्याय होत आहे. पाथर्डी आणि शेवगाव तालुका हे दोन्ही तालुके संपुर्ण गंभीर दुष्काळी तालुके असून त्यांचा समावेश हा गंभीर दुष्काळी यादीत व्हावा. मंडळांनुसार गंभीर, मध्यम, दुष्काळसदृश असा  निकष न लावता संपुर्ण पाथर्डी आणी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा. सहकारी व कृषी कर्ज माफ करावे. जनावरांना चारा, पेंड, पाणी उपलब्ध करून द्यावे.दुष्काळी अनुदान, पीकविमे, रोजगार हमीची कामे, शैक्षणिक फी सवलत यांसारख्या योजना या दोन्ही तालुक्यात लागू कराव्यात.आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संपुर्ण तालुकाभर शृंखलाबध्द पध्दतीने कोणत्याही स्वरूपांची आंदोलने करू असे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 

COMMENTS