राहाता/प्रतिनिधी ः राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अश्या मागणीसह अन्य मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या आहे.त्यासाठी स्वाभिमानी शेत
राहाता/प्रतिनिधी ः राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अश्या मागणीसह अन्य मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या आहे.त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार ओहोळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आपला राहाता तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.तसेच अतिवृष्टीची रक्कम राहीलेल्या शेतकर्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावी, खरीपातील पाऊस न झाल्यामुळे सर्व पिके जळाली आहे. त्यास तातडीने विमा व दुष्काळ निधी मिळावा. केद्र सरकारने कांदयाच्या निर्यातीवर 10 टक्के निर्यात शुल्क वाढवून तो 40 टक्के लावला आहे. तो तातडीने रद्द करावा. शासनाने दुधाला प्रतीलिटर 40/- रुपये भाव मिळावा. दुष्काळामुळे शेतकर्याचे कर्ज व विजबिल माफ करावे. गोदावरी कालव्यातून शेतकर्याना उभे असलेले सर्व पिकाना पाणी दयावे. निळवंडे कालव्याचे राहिलेले काम त्वरित पूर्ण करून लाभ क्षेत्र धारकांना आवर्तन मिळावे.शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव देवून स्वामीनाथन आयोग प्रमाणे 50 टक्के नफा द्यावा.सदरील मागणीचे निवेदन नायब तहसीलदार ओहोळ यांनी स्वीकारले. तसेच शासनाकडे पाठण्यात यावे. मागण्या मान्य झाल्यास कुठलीही सुचना न देता स्वाभिमानी शेतकरी संघटना व तालुक्यातील सर्व शेतकरी तिव्र आंदोलन छेडतील. याची नोंद घ्यावी.निवेदन देतेवेळी विठ्ठलराव शेळके,शंकरराव लहारे,बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब एलंम ,पुंजाराम आहेर, ज्ञानेश्वर सोडणार,मिनानाथ पाचरणे, संजय गोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
COMMENTS