Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात दुष्काळ जाहीर करा ः सुप्रिया सुळे

पुणे : राज्यातील पावसाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहे. जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण दिलासादायक राहिले. मात्

जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा
पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे
भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न

पुणे : राज्यातील पावसाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहे. जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण दिलासादायक राहिले. मात्र ऑगस्ट महिनाही आतापर्यंत कोरडा गेला आहे. पावसाने ओढ दिल्यांना शेतकर्‍यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्या पावसांनंतर पेरणी केलेली पिकं पावसाअभावी करपू लागली आहे.
संपूर्ण हंगाम वाया गेल्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याच परिस्थितीवर आता  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले की, महाराष्ट्रात जून, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी आहे. 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे.  बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकर्‍यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकर्‍यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

COMMENTS