Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई : दादर परिसरात असलेले 80 वर्ष जुने हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली होती. त्यानंतर मुंबईमध्ये शनिवारी मोठा तणाव पाहायला मिळाल

छत्र बोरगाव शाळेची प्रवेश दिंडी निघाली उत्साहात
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार
हेल्पिंग हॅण्ड्सचे भैय्या बॉक्सर यांचा महात्मा गांधी मानवता पुरस्काराने गौरव

मुंबई : दादर परिसरात असलेले 80 वर्ष जुने हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली होती. त्यानंतर मुंबईमध्ये शनिवारी मोठा तणाव पाहायला मिळाला, यासोबतच राजकीय वातावरण देखील तापले होते. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ’एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत’, अशी टीका भाजपवर केली होती. तर भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राजकीय तणाव वाढण्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती घेतली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. तर हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

COMMENTS