Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय लवकरच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकर्‍यांना आश्‍वासन

नाशिक/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असला तरी, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी येथे दिली भेट 
दांडिया आयोजकांनी रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक
सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान ः मुख्यमंत्री शिंदे

नाशिक/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असला तरी, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय घेवू असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांना दिले आहे. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या. शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकर्‍यांना धीर दिला. बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोर्‍यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी दि. 8 एप्रिल,2023 रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी. मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी. एस. कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून आम्ही जाहीर केला. कांद्याचे अनुदान साडेतीनशे रुपये केले. केंद्राचे सहा हजार शेतकर्‍यांना मिळायचे. त्यात आता महाराष्ट्र सरकार सहा हजार रुपये देत आहे. शेतकरी वाचला पाहिजे. आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे होतील. बळीराजा केंद्र बिंदू आहे. तो सर्वांना जगवतो. त्याच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे प्रभू रामचंद्रांना घातल्याचे त्यांनी सांगितले. पारस (जि.अकोला) येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली असून, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत.

COMMENTS