Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हळदीवर अडत्या जीएसटी न आकारण्याचा निर्णय

सांगली / प्रतिनिधी : हळदीवर आता अडत्या जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय अपिलिय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने दिला आहे. या निर्णयाने पाच वर्षांच्या लढ्य

अंमली पदार्थासह गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तिघेजण पोलीस कोठडीत
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाकडून गावोगावी प्रसिध्दी
कराड-पाटण मार्गावर ओमनी-दुचाकी धडकेत तिघे गंभीर

सांगली / प्रतिनिधी : हळदीवर आता अडत्या जीएसटी आकारणार नसल्याचा निर्णय अपिलिय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने दिला आहे. या निर्णयाने पाच वर्षांच्या लढ्याला यश आले आहे. दरम्यान, हळदीच्या खरेदी-विक्री व्यवहारावर 5 टक्के जीएसटी असणार आहे. जीएसटी कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
सांगली मार्केट यार्डात हळदीवरील जीएसटी आकारणीच्या पध्दतीतून खरेदीदार व्यापार्यांचे भांडवल अडकून पडत होते. खरेदीदार व्यापार्‍यांनी त्याकडेवळी केंद्रीय जीएसटी तसेच केंद्र, राज्य सरकारचे अनेकदा लक्ष वेधले होते. अखेर अपिलिय अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने निर्णय दिला आहे. शेतकरी त्यांच्या शेतात हळदीवर प्राथमिक प्रक्रिया करून प्राथमिक बाजारपेठेत माल आणतात. त्याच्या अडत कमिशनवर जीएसटी लागणार नाही, असा निर्णय या प्राधिकरणाने दिला आहेे. महाराष्ट्र राज्याचे जीएसटी कमिशनर राजू मित्तल व केंद्रीय जीएसटीचे मुख्य आयुक्त अशोक मेहता हे या प्राधिकरणाचे अधिकारी आहेत.

COMMENTS