अलीबाग/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळभल इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एनडीआरएफच्या टीमकडून बचावक
अलीबाग/प्रतिनिधी ः रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळभल इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. घटनास्थळावर गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 29 वर पोहचला आहे. तर 76 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
चौथ्या दिवशीही सकळी 6 वाजल्यापासून बचावकार्य सुरु करण्यात आले. रविवारी सकाळपासून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मृतांचा आकडा हा 29 वर पोहचला आहे. तर 76 जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता असणारे सर्वजण जिंवत असतील की नाही याची शंका व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरु आहे. पण पाऊस, धुके आणि चिखल यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अशामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सध्या बचावकार्य थांबवण्यात आले आहे. आजही पूर्णदिवस बचावकार्य केले जाणार आहे. पण बचावकार्य थांबवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन हे बचावकार्य थांबवले जाऊ शकते. तळीये दुर्घटनेप्रमाणेच बचावकार्य थांबवत इतर बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, ’ढिगार्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्याची आशा नाही. तरी देखील जनतेच्या भावना लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, घटनास्थळावर ढिगार्याखाली अडकलेल्या गावकर्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली आहे. आपला माणून ढिगार्याखालून जिवंत बाहेर काढला जाईल या आशेने ते वाट पाहत तिथेच बसले आहेत. रडून रडून या सर्वांच्या डोळ्यातील अश्रू आटले आहेत. आपल्या माणसाचा बचाव व्हावा यासाठी ते प्रार्थना करत आहेत. इर्शाळवाडीची दुर्घटना घडली त्यावेळी 46 घरांवर दरड कोसळली. या गावामध्ये 229 जण राहत होते. काही जण गावाबाहेर गेले असल्याने आणि काही जण गावातील शाळेमध्ये झोपायला गेल्यामुळे बचावले.
COMMENTS