दाऊद कंपनीकडून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याच्या धमक्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दाऊद कंपनीकडून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याच्या धमक्या

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमा

ते भास्कर जाधव नसून बाष्फळ जाधव
दूध विक्रेत्याला हॉर्न वाजवणे पडले महागात, तिघांकडून बेदम मारहाण
नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचे महत्व

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून धक्कादायक मेसेज आल्यानंतर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर यावेळी एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप आल्या आहेत. यामध्ये एका अज्ञात इसमाने दावा केला आहे की, एका ऑडिओ क्लिपमध्ये दाऊदच्या दोन हस्तकांची नावे घेतली आहेत. हे दोघे जण पंतप्रधान मोदींना मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे. तसेच हे हस्तक देशाला बरबाद करण्याच्या प्रयत्नात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ 21 नोव्हेंबरला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले. एका अधिकार्‍याने सांगितले की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान एका व्यक्तीसंदर्भात चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासाअंती असे समोर आले की, मेसेज करणार्‍या व्यक्ती पूर्वी एका हिर्‍याच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एप्रिल महिन्यात देखील देण्यात आली होती. मुंबईच्या एनआयए शाखेत याबाबत मेल आला होता. मेल करणार्‍याने 20 किलो आरडीएक्स तयार आहे. आणि 20 लाख लोकांना मारण्याचा कट रचल्याचे म्हटले होते. एकूणच यामध्ये पंतप्रधान मोदी आणि दाऊद इब्राहिम यांचा उल्लेख असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

COMMENTS