पुणे/प्रतिनिधी ः एका जमीन डेव्हलपर्सकडे पुण्यातील घोरपडी येथे राहणार्या महिलेने जमीन विकत घेतली होती.मात्र, संबंधित डेव्हलपरने पैसे घेऊन ही जमि
पुणे/प्रतिनिधी ः एका जमीन डेव्हलपर्सकडे पुण्यातील घोरपडी येथे राहणार्या महिलेने जमीन विकत घेतली होती.मात्र, संबंधित डेव्हलपरने पैसे घेऊन ही जमिनीचे खरेदी खत करून न दिल्याने, सदर महिलेने त्याबाबतची विचारणा केली असता, तिला व तिच्या पतीला आरोपींनी शिवीगाळ करून दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विलास हिरामण काळभोर, स्वप्निल शरद काळभोर, सिंधू शरद काळभोर, सुनिता विलास काळभोर, सुप्रिया सुनील काळभोर ,दत्ता मोराळे (सर्व राहणार- लोणी काळभोर, पुणे )या आरोपींवर या प्रकरणी आर्थिक फसवणूक आणि धमकी देणे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी स्वाती बाबासाहेब शिंदे (वय-38, राहणार-घोरपडी, पुणे) यांनी आरोपीं विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे. आरोपी यांनी तक्रारदार यांना लोणीकाळभोर परिसरात जमीन गट क्रमांक 334/1 मध्ये शंभू डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिंग करून जमीन विक्री करत असल्याचे सांगितले. त्यामध्ये दीड गुंठा जमीन प्रतिगुंठा दहा लाख 70 हजार रुपये प्रमाणे ठरवून तक्रारदार यांच्याकडून आरोपींनी चार लाख रुपये घेतले होते. मात्र, पैसे स्वीकारूनही त्यांनी आत्तापर्यंत जमिनीचे खरेदीखत करून न दिल्याने तक्रारदार या आरोपींच्या घरी विचारणा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या पतीस शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देत, ऑनलाईन दीड लाख रुपये तक्रारदार यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून उर्वरित अडीच लाख रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली आहे.
COMMENTS