Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी

राळेगण सिद्धी प्रतिनिधी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून श्रीरामपूर येथे निपाणी वडगाव संतोष गायधनी नावा

कानडगाव येथे सशस्त्र दरोडा
अहमदनगर ब्रेकिंग : अण्णासाहेब शेलार यांचे ‘नागवडे’चे संचालकपद रद्द
छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम

राळेगण सिद्धी प्रतिनिधी – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून श्रीरामपूर येथे निपाणी वडगाव संतोष गायधनी नावाच्या व्यक्तीने प्रशासन आणि मंडळी अन्याय करतअसल्याचाआरोप करत अण्णा हजारे यांना येत्या 1 मे रोजी राळेगणसिद्धी मध्ये जाऊन त्यांची हत्या करण्याचा इशारा संतोष यांनी दिला आहे. श्रीरामपूर तालुक्यात निपाणी वडगाव गावात संतोष गायधने यांची शेतजमीन आहे. त्या शेतीच्या वादातून 96 जणांनी मिळून गायधने कुटुंबावर दबाब आणला आहे. विविध मार्गाने खोट्या केसेस दाखल करुन कुटुंबाचा मानसिक छळ सुरु आहे.त्यामुळे कुटुंब दहशतीखाली आहे. अण्णा हजारे यांना सांगून देखील त्यांना निवेदन करून देखील कारवाई होत नसल्याने गायधने कुटुंब संतप्त झाले असून त्यानी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली असून 1 मे रोजी अण्णा हजारे यांना ठार मारणार असा इशारा  देण्यात आला आहे.  अण्णा हजारेंना दिलेल्या हत्येच्या धमकीने प्रशासनात खळबळ उडाली आहे. संतोष गायधने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अण्णा हजारे  यांचे समर्थक करत आहे.  

COMMENTS