मुंबई प्रतिनिधी - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आ
मुंबई प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना या धमकीसंदर्भात मेसेज आला होता. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या धमकीनंतर तात्काळ पोलिसांनी सुत्रे हालवत धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीवजा मेसेज आला आहे.या मेसेजमध्ये अज्ञात आरोपीने उत्तर प्रदेशमधील योगी आदीत्यनाथ यांचे सरकार आणि मोदी सरकार निशाण्यावर असल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने मेसेजमध्ये काही ठिकाणी काडतुसे आणि एके ४७ असल्याचे देखील सांगितले. मुंबईत पून्हा २६/११ चा हल्ला करणार असल्याची धमकी आरोपीने दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादवी कलम ५०९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. दिल्ली पोलिसांना फोनवरुन ही धमकी देण्यात आली होती. धमकीच्या कॉलनंतर यानंतर तात्काळ पोलिसांनी सुत्रे हालवली आणि धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी एक टीम तैनात केली होती. दिल्लीतील मादीपूर मतदारसंघातील रहिवासी सुधीर शर्मा नावाच्या व्यक्तीने हे कॉल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
COMMENTS