Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

नागपूर/प्रतिनिधी ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री यांना पुन्हा एकदा नवी दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपीनी फोन करून जीवे मारण्याची धमक

पोलिस असल्याचे सांगून पैसे व दारु बॉक्सची मागणी
अहमदनगर जिल्ह्यात मेडीकल ऑक्सीजन पुरवठा आणि औषधसाठा पुरेसा उपलब्ध
रणबीर-रश्मिकाच्या ‘अ‍ॅनिमल’ने केली तीन दिवसांत केली 200 कोटींपेक्षा जास्त कमाई

नागपूर/प्रतिनिधी ः भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री यांना पुन्हा एकदा नवी दिल्लीतील निवासस्थानी अज्ञात आरोपीनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.  
नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी आणि त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्बशोधक नाशक पथक तसेच सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांना यापूर्वी कर्नाटक मधील बेळगाव जिल्हा कारागृहातील जन्मठेपेचा आरोपी जयेश पुजारी याने 100 कोटी रुपयांची खंडणी मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी जयेश पुजारी याला अटक करून त्याच्यावर य एपीए कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे. सध्या जयेश हा एनआयए पथकाच्या ताब्यात आहे.

COMMENTS