Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी

पुणे प्रतिनिधी - राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या क

मोदी आवास योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लाभ मिळवून द्या -: मंत्री छगन भुजबळ
कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार-: मंत्री छगन भुजबळ
येवला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन

पुणे प्रतिनिधी – राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयात असलेल्या कार्यकर्त्यांच्या फोनवर कॉल करून ही धमकी दिली गेली. तसंच छगन भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली असल्याचंही धमकी देणाऱ्याने सांगितलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याने मद्यधुंद अवस्थेत फोन केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी छगन भुजबळ हे पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर कॉल आला. त्यावर छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याचं धमकी देणाऱ्याने सांगितलं. छगन भुजबळ यांच्या कार्यालयाने त्यानंतर तात्काळ याबाबतची माहिती पुणे पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने केला आणि मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील नावाच्या व्यक्तीला महाडमधून अटक केली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलने छगन भुजबळ यांना धमकी दिल्याचं स्पष्ट झालं. प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापुरचा असल्याची माहितीसुद्धा समोर आलीय.

COMMENTS