Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

पुण्यातून आला धमकीचा कॉल

पुणे प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा कॉल आलाय. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असं बोलून हा कॉल कट झाला. पोलिसा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौर्‍यावर; पोलीस प्रशासनाकडून व्यासपीठाची पाहणी 
गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा कॉल आलाय. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असं बोलून हा कॉल कट झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत कॉल करणा-याला ताब्यात घेतलाय. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. डायल 112 ला हा फोन आला होता. पोलिसांनी शोध सुरू केला असता पुण्यातील वारजे इथलं हे कॉल लोकेशन असल्याचं उघड झालं. कॉल करणारा धारावीत राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री  शिंदे यांना उडून टाकण्याची धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आले. यावेळी त्याने आपण दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. पुण्यातील वारजे परिसरातून त्याने 112 क्रमांकावर फोन लावून ही धमकी दिली होती. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या अनेकदा धमक्या आल्या आहेत. मात्र हा कॉल नागपूरमध्ये कंट्रोल रूमवर आल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय नेत्यांना धकमीचे फोन वारंवार येत असल्याचे दिसून येत आहे. याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दोन वेळा धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी बेळगाव येथून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

COMMENTS