राहाता ः तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणापैकी एका 16 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घट
राहाता ः तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणापैकी एका 16 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजता दरम्यान कोल्हार येथील बेलापूर रस्त्यालगत पानमळ्या जवळ घडली आहे. प्रवरा नदीमध्ये भगवतीपुर परिसरातील 3 शालेय विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते. त्या तिघांपैकी अविनाश पाराजी जोगदंड या विद्यार्थ्यांने अंगातील कपडे काढून नदीप्रात्रात पोहण्यासाठी उडी घेतली. परंतु वाळू उपशामुळे नदी पात्रात झालेल्या मोठमोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो खड्ड्यातून वर येत नसल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. आपला मिञ बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे 2 मित्र गणेश रावण वक्ते व शुभम चौरसिया यांनी आरडाओरड करत घरी सांगण्यासाठी पळत सुटले. घटनेची माहिती वार्यासारखे पसारताच भगवतीपूर मधील ग्रामस्थांनी प्रवरा नदी पाञाच्या काठावर गर्दी केली. घटनेची माहिती समजतात लोणी पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व पो.हे.काँ. मन्सीर शेख, राहाता नगरपालिकेचे अग्निशामन दल पथक व त्यांचे सहकारी,कामगार तलाठी वाघ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. सुमारे पाच तासानंतर तरुणाचा शोध लागला.
COMMENTS