कर्जत : कर्जत तालुक्यातील राशीन येथे पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा श्री काशीविश्वेश्वर मंदिराच्या ओवरीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही
कर्जत : कर्जत तालुक्यातील राशीन येथे पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा श्री काशीविश्वेश्वर मंदिराच्या ओवरीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर उर्फ पिंटू पोपट साळवे ( वय : 42) असे मयताचे नाव आहे. राशीन ग्रामपंचायतीसमोर असलेल्या काशीविश्वेश्वर मंदिराच्या ओवर्यावरील कपारीत असणार्या पारव्याला पकडताना ज्ञानेश्वर साळवे याचा तोल जाऊन तो खाली पडला. दगडी पायरीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई- वडील असा परिवार आहे. राशीन येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट साळवे यांचा तो मुलगा होत.
COMMENTS