Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य सेवा न मिळाल्याने विवाहितेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निषकाळजीपणाचा दोन महिन्यांत दुसरा बळी

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीदरम्यान वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने प

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
महिला वकिल यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न
चार गावच्या टाक्यांसह 72 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील केर, ता. पाटण येथील विवाहितेचा प्रसूतीदरम्यान वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवा पुन्हा चर्चेत आली आहे. रात्री-अपरात्री रुग्णांना खाजगी तसेच शासकीय आरोग्य सेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या पाटण सारख्या शहरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणा व कर्तव्यात दाखविलेल्या हालगर्जीपणामुळे रुग्णांना स्वतःच्या जिवाला मुकावे लागत आहे. केवळ वैद्यकिय व्यवसाय धंदा डोक्यात ठेवून धंदा करणार्‍या डॉक्टरांना त्यांच्या कर्तव्याची जबाबदारी कळत नसेल तर रुग्णांच्या मृत्यूस कारणीभुत ठरणार्‍या डॉक्टरविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांची सनद रद्द करावी, अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून होत आहे.
केर येथील विवाहिता सौ. रेश्मा जितेंद्र यादव (वय 25) या गरोदर होत्या. यांना शनिवारी सायंकाळी उशीरा प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्यानंतर त्यांनी पाटण येथील खाजगी दवाखान्यात जाणे पसंत केले. मात्र, खाजगी डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. गरदोर काळात जिथे पहिल्यापासून उपचार सुरू होते. त्या महिला डॉक्टरांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही दवाखान्यात आला तरच मी तुम्हाला पुढील उपचार करेन अन्यथा करणार नाही, असे सांगितले होते. म्हणून नातेवाईकांनी पाटण शहरातील इतर खाजगी दवाखान्यात नेणे पसंत केले. मात्र, इतर डॉक्टरांनी देखील उपचार कलण्यास नकार दिला.
त्यानंतर त्यांनी मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी संबंधित विवाहितेला दाखल केले. याठिकाणी नैसर्गिक प्रसूती होऊन मुलाला जन्म दिला. मात्र, रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मल्हारपेठ येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना कराडला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी कराड येथे कृष्णा हॉस्पिटल दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित विवाहितेला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेने पाटण तालुक्यातील आरोग्य सेवा पुन्हा वादळात सापडली आहे. खाजगी तसेच शासकीय अधिकारी रात्री-अपरात्री परगावाहून येणार्‍या रुग्णांना तपासणी न करताच कराडला जाण्याचा सल्ला देतात. मात्र, कराड हे अंतर किमान एका तासाचे असल्याने याठिकाणी अस्वस्थ रुग्णाला उपचार मिळेपर्यंत आणखी अस्वस्थ वाटू लागते. परिणामी रुग्णाचा मृत्यूही संभवतो. त्यामुळे कराडला जाण्याचा सल्ला देणार्‍या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS