Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 36 फ्लेमिंगोचा पक्ष्यांचा मृत्यू

मुंबई ः येथील विमानतळावर उतरणार्‍या एका विमानाची फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला धडक बसल्याने 36 फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपर

मुळा उजव्या कालव्याची जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून पहाणी
आंबट गोड चिंचामुळे अनेकांना मिळाला रोजगार
संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांचे खाजगी सुरक्षा रक्षक

मुंबई ः येथील विमानतळावर उतरणार्‍या एका विमानाची फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला धडक बसल्याने 36 फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरच्या पंतनगर येथील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी रात्री घडली आहे. आणखी जखमी फ्लेमिंगोंचा परिसरात शोध घेणे सुरू आहे. ईके 508 क्रमांकाचे अमिराती कंपनीचे विमान काल, सोमवारी रात्री 9 वाजून 18 मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरत असताना ही घटना घडली.  विमान उतरताच फ्लेमिंगो पक्ष्यांना धडक बसल्याची माहिती विमानतळ अधिकार्‍यांना देण्यात आली. सध्या हे विमान ग्राऊंड करण्यात आले असून एअरक्राफ्ट इंजिनियर या विमानाची तपासणी करत आहे.

COMMENTS