हिंगोली ः आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत हिंगोलीत सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारपासून आमरण उपोषण सुरु करण्य

हिंगोली ः आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत हिंगोलीत सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. यावेळी 15 नागरिकांनी ठिय्या आंदोलन देखील सुरु केले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशी भूमिका यावेळी घेण्यात आली आहे. हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते बालाजी वानखेडे, रमेश जाधव यांनी उपोषण सुरू केले आहे.
COMMENTS