अहिल्यानगर, दि.२ - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, देहराडूनच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास १५ एप्रि

अहिल्यानगर, दि.२ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, देहराडूनच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (पुणे) आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
या परीक्षेचे आयोजन १ जून २०२४ रोजी करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ होती. मात्र, आता या मुदतीत वाढ करून ती १५ एप्रिल २०२४ करण्यात आली आहे, असे श्रीमती ओक यांनी कळविले आहे.
COMMENTS