Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेसह पुरूषाचा आढळला मृतदेह

हडपसर परिसरातील कालव्यात मृतदेह आढळले

पुणे ः पुणे शहरातील हडपसर परिसरात एका कालव्यात महिला आणि पुरुष असे दोन मृतदेह एकाचवेळी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाण्यात वाहून आलेल्या मृतदेह

महायुतीचे नेते करणार राज्याचा संयुक्त दौरा
आजचे राशिभविष्य… दि. २९ सप्टेंबर २०२१
लेखी आश्‍वासनानंतर प्रहारचे उपोषण स्थगित

पुणे ः पुणे शहरातील हडपसर परिसरात एका कालव्यात महिला आणि पुरुष असे दोन मृतदेह एकाचवेळी मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. पाण्यात वाहून आलेल्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 हडपसर मधील वैदुवाडी भागातील स्थानिक रहिवाशांनी कालव्याचे पाण्यात सोमवारी रात्री दोन मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती हडपसर पोलिसांना दिली. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशामक दलाचेही जवान देखील आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्यात उतरून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात पाठवले. मयतांची नेमकी ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पुणे शहरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तींच्या नोंदीवरून हडपसर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हडपसर पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

COMMENTS