Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे अडकला लग्नबंधनात

मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'महाराष्ट्राची हस्त्यजत्रा' मधील वन अँड ओन्ली दत्तू मोरे नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. दत्तूच

जितेंद्र आव्हाडांच्या जीवाला धोका
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक
अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘महाराष्ट्राची हस्त्यजत्रा’ मधील वन अँड ओन्ली दत्तू मोरे नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. दत्तूच्या प्रिवेडींगचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. दत्तू हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. आता स्वतःला वन अँड ओन्ली म्हणवणारा हा दत्तू एकटा राहिला नाहीये. त्याच्या आयुष्यात नवीन जोडीदार आली आहे. नुकताच त्याचा विवाह पार पडला आहे. दत्तूने २३ मे मंगळवार रोजी विवाहगाठ बांधली. त्याने स्वाती घुंगाने हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. आता दत्तूच्या नव्या आयुष्याला सुरुवात होत आहे. त्याच्या प्रिवेडींग फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यात दत्तू त्याच्या पत्नीसोबत हटके पोज देताना दिसत आहे. त्यांनी हे फोटो शेअर करत ‘जस्ट मॅरीड’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोंमध्ये ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. एका फोटोत ते एका नावेत आहेत तर दुसऱ्यात त्यांनी ब्लॅक रंगाचं ट्विनिंग केलं आहे.

COMMENTS