Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रासपची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार : दत्तात्रय शिंदे

माका ः राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी नेवासे तालुक्यातून महायुतीकडून उमेदवारी देवू अथवा न दवो, राष्ट्रीय समाज पक्

शिवसेनेकडून महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल l पहा LokNews24
देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था
नागरिकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाऊन अटळ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

माका ः राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी नेवासे तालुक्यातून महायुतीकडून उमेदवारी देवू अथवा न दवो, राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात रासपकडून उमेदवारीबाबत आदेश मिळाल्यास निवडणूक लढणार असल्याचे ठाम मत रासपचे नगर जिल्हा उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे.  यासंदर्भात लवकरच पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या प्रमुख उपस्थित राज्याचे उत्तरमहाराष्ट्र अध्यक्ष शरदभाऊ बाचकर, उपाध्यक्ष शशिकांत मतकर व नगर जिल्हाअध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा तसेच तालुका पक्षाची कार्यकारणी पदाधिकार्‍यांची पक्ष अध्यक्षकांसमवेत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.                                                  
या अगोदरही नेवासे तालुक्याला महायुतीचा धर्म पाळत रासपने युतीचा आमदार विधानसभेच्या निवडणुकीत निवडून दिला होता. यामुळे सध्यातरी तालुक्यात रासप पक्षाला मानणारी मते भरपूर असून, तालुकाकार्य कारणीतील कार्येकर्ते जनतेच्याअडचणी, कामकाजात सातत्याने लोकसहभागी असून कार्यरत आहेत. शिंदे यांनी या अगोदर रासपचे नेवासे तालुकाअध्यक्ष म्हणून दोनदा जनतेत सहभागी होऊन काम पाहिले असल्याने, महायुतीकडून जर रासपला उमेदवारीसाठी संधी मिळाल्यास, तसेच पक्षश्रेष्ठीकडुन यासंबंधी आदेश आल्यास, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, जनतेच्या कृपाआशीर्वादाने, उमेदवारी करण्यास इच्छूक असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.  

नेवासे तालुक्यात आजरोजी जातीपातीचे राजकारण केले जात आहे. गत काळात रासपने युती धर्मपाळला असून, महायुतीचा आमदार निवडून दिला होता. सध्यातरी तालुक्यात रासपला मानणारा वर्ग मोठ्याप्रमाणात असून, महायुतीकडून महादेवजी जानकर यांच्या कृपा आशीर्वादाने उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पक्षाच्या आदेशानुरचं यापुढे पक्षाचे कामे करुन, विधानसभेची निवडणूक लढवण्या इच्छूक असून, सर्वाच्या सहकार्यातून संगनमताने तालुक्याचा चौफेर विकास करुन संधीच सोने करुन दाखवू.
दत्तात्रय शिंदे, रासप, जिल्हाउपाध्यक्ष

COMMENTS