Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दत्ता गायकवाड यांची शिवसंग्राम मधून हाकलपटी

बीड ः शिवसंग्राम राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.ज्योती विनायकराव मेटे या लोकसभा निवडणूक लढवणार होत्या मात्र त्यांनी समज हितासाठी माघार घेत शिवसंग्रम निवडण

पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोेसळून कामगाराचा मृत्यू
प्रदर्शनाच्या आधी सुभेदार चित्रपटाचा रेकॉर्ड
मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही…पडळकरांची परबांवर टीका | LOKNews24

बीड ः शिवसंग्राम राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.ज्योती विनायकराव मेटे या लोकसभा निवडणूक लढवणार होत्या मात्र त्यांनी समज हितासाठी माघार घेत शिवसंग्रम निवडणूक रिंगणात उतरणार नाही आणि तटस्थ भूमिकेत राहील हे स्पष्ट केले नंतर शिवसंग्रामचे दत्ता गायकवाड यांनी शिवसंग्रामच्या धेय्य धोरण विरोधात जात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांचे शिवसंग्राम मधून निलंबन करण्यात येत आहे. अशी माहिती शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद यांनी दिली आहे. बीड लोकसभा निवडणूक आता जोर धरू लागली आहे. यात शिवसांग्रम तटस्थ भूमिकेत असून शिवसंग्रमचा कोणताही उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. यात शिवसांग्रमचा कसलाही संबंध नाही. शिवसंग्रामच्या धेय्य धोरण विरोधात भूमिका घेतल्या कारणाने त्यांची शिवसंग्राम मधून हकाल पट्टी करत त्यांना निलंबित करण्यात येत आहे. यापुढे दत्ता गायकवाड यांचा शिवसंग्रामशी कसलाही संबंध नसणार आहे.असे पत्रकात शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद यांनी म्हंटले आहे.

COMMENTS