Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिंचोली कुस्ती मैदानात दत्ता बानकर नंबर वन; मैदानात मल्लविद्या केंद्र शेडगेवाडीच्या मल्लाचे वर्चस्व

चिंचोली : प्रथम क्रमांकाची कुस्ती जोडताना डी. आर. जाधव, संपतराव जाधव, तानाजी चवरे, मनोज मस्के आदी मान्यवर. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.) शिराळा /

‘‘मै झुकेगा नही…”, जडेजानं मैदानातच केली ‘पुष्पा’ची रावडी स्टेप | LokNews24
Beed हॉकीचा सुवर्णकाळ परतला ! l LokNews24
खेळाडूंना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणं दु:खद – नीरज चोप्रा

शिराळा / प्रतिनिधी : चिंचोली (ता. शिराळा) येथे स्वर्गीय पै.जगन्नाथ जाधव यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ झालेल्या कुस्ती मैदानात पै. दत्ता बानकर (चिंचोली) याने लक्ष्मण जाधव (इचलकरंजी) यांच्यावर सातव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर नेत्रदिपक विजय मिळवला. ओंडचा पै. विकी थोरात आणि पेरीडचा पै. कर्तार कांबळे यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. चिंचोलीचा पै. ओंकार जाधव याने पोकळ घिस्सा डावावर इचलकरंजीचा पै. शहाजी फल्ले याचेवर विजय मिळवला. चिंचोलीचा पै. मयुर जाधव याने कणदुरच्या पै. प्रदिप पाटील यांच्यावर तिसर्‍या मिनिटाला एक चाक डावावर विजय मिळवला. पै. अर्थव पाटील (कुस्ती केंद्र शेडगेवाडी) याने पै. पांडुरंग कोळापटे (तुरुकवाडी) यांच्यावर चटकदार विजय मिळवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन ज्येष्ठ पैलवान यांच्या हस्ते करण्यात आले. मैदानाचे संयोजन सुरेश जाधव व दिनेश जाधव मित्र परिवार तसेच बाजीराव जाधव, शरद पाटील, राहुल जाधव, कपिल जाधव, रणजित पाटील, अनिल पाटील, धनाजी जाधव, तानाजी जाधव, जगन्नाथ लोहार यांनी केले. या मैदानासाठी जिल्हा बॅकेचे संचालक सत्यजित देशमुख, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव, माजी सभापती हणमंतराव पाटील, उपसभापती बाळासाहेब नायकवडी, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, ऑलंम्पिक वीर बंडा पाटील, डॉ. नंदकुमार पाटील, शिवाजी लाड, विश्‍वप्रतापसिंह नाईक, कुस्ती कोच उत्तम पाटील, तानाजी चवरे, आनंदराव पाटील, विकास शिरसट, वसंत पाटील, पांडुरंग पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. पंच म्हणून संदिप पाटील, तानाजी चवरे, वसंत जाधव, आनंदा भोसले तर मैदानाचे समालोचन पै. सुरेश जाधव यांनी केले. हालगीवादन मारुती मोरे कागल यांनी केले.
भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव यांनी कुस्तीसाठी अनेकांना मदतीचा बूस्टर दिला आहे. राज्यातील कुस्ती वाढावी म्हणून ते सदैव प्रयत्नात असतात. चिंचोली मैदानात विजेत्या मल्लांना त्यांनी खिशात हात घालून मदत केली. इतकेच नव्हे तर अंतिम कुस्तीसाठी रोख 5 हजार स्वतंत्र बक्षिस देऊन शौकीनांची मने जिंकली.
कुस्ती मैदानात मल्ल विद्या केंद्रांच्या मल्लाचे वर्चस्व
चिंचोली येथे झालेल्या कुस्ती मैदानात शेडगेवाडी कुस्ती मल्लविद्या केंद्राच्या लहान व मोठ्या मल्लांनी चटकदार कुस्त्या करत कुस्ती शोकीनांची मने जिंकली.

COMMENTS