फलटण/प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात ये
फलटण/प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (6 जानेवारी) पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले (ता. देवगड) येथे होणार आहे. नगरमधील पत्रकार निशांत वसंत दातीर यांना उत्तर महाराष्ट्र विभागातून 2019चा पुरस्कार तर मिलिंद चवंडके यांना 2020चा पुरस्कार यावेळी देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’सभागृहात गुरुवार दि.6 जानेवारी 2022 रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी सकाळी 10:30 वाजता आयोजित केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी दिली आहे. कोरोना’ परिस्थितीमुळे सन 2019 व सन 2020 या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले होते. यंदाच्या राज्यस्तरीय पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण आयोजित केले असून सध्याच्या शासन नियमानुसार केवळ 50 लोकांच्या उपस्थितीतच मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम होणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटूंबीय यांच्यावतीने सांगण्यात आले आहे. दर्पण पुरस्कार मिळालेले निशांत दातीर यांनी तब्बल 22 वर्षे विविध वृत्तपत्रांतून शहर प्रतिनिधी, ते आवृत्ती प्रमुख या पदावर काम पाहिले आहे. निशांत दिवाळी अंक, साप्ताहिक संत नगर टाइम्स, लोकअंकुरमध्ये संपादक म्हणून सध्या काम पाहत आहेत. कोपर्डी येथील घटनेच्या वार्तांकनाच्या वृत्तमालिकेच्या लिखाणाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दातीर यांना यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फाउंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान व अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
COMMENTS