Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंधारे मॅडम भिंती रंगविल्या शोभा वाढली; आता 44 खड्ड्यात झाडे लावून शोभा द्विगुणीत करा

जागोजागी कचर्‍याचे ढिगारे अस्ताव्यस्त कचराकुंडी

बीड प्रतिनिधी - बशीरगंज ते रिपोर्टर भवन व जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी गृह विभागाच्या संरक्षक

रिषभ पंतचे टीमला सरप्राईज 
Pune : धाडसत्राच्या निषेदार्थ पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक (Video)
पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंत्यांना सूचना

बीड प्रतिनिधी – बशीरगंज ते रिपोर्टर भवन व जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय या रस्त्यावर मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी गृह विभागाच्या संरक्षक भिंतींवर रंगरंगोटी करून शोभा वाढविली आहे. याच रस्त्यावरील झाडांसाठी सोडण्यात आलेल्या 44 खड्ड्यात झाडे लावलेली नाहीत. या खड्ड्यांमध्ये झाडे लावून शोभा द्विगुणीत करायला हवी. यामुळे पर्यावरणाचे रक्षण करायला हातभार लागेल. शिवाय नयनरम्य वातावरण देखील तयार होईल असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे की, बशीरगंज ते रिपोर्टर भवन व जुने एस.पी. ऑफिस ते जिल्हा रुग्णालय हा रस्ता 24 तास वर्दळीचा आहे. जिल्हा रुग्णालय असल्याने जिल्हाभरातील लोक येथून ये-जा करतात तसेच शहराच्या मध्यभागी असल्याने शहरात येणार्‍या जाणार्‍यांना याच रस्त्यावरून ये-जा करावी लागते. 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षा व व्यंगात्मक निषेध, भिक मांगो आणि बेशरम आंघोळ या तीन आंदोलनानंतर काही वर्षापूर्वी येथील रस्ते सिमेंट काँक्रिटने बनवण्यात आले. रस्ता बनवताना रस्त्याच्या कडेला झाडांसाठी खड्डे सोडण्यात आले. त्यात तेव्हा झाडे लावण्यात आली होती. काही मोठी झाडे तगली तर लहान लावलेली झाडे देखभालीअभावी कोमेजली. यामुळे एक दोन नव्हे तर चक्क 44 खड्डे झाडांविना रस्ता तयार केल्यापासून पडून आहेत. त्यात नंतर पुन्हा झाडे लावण्यात आली नाही. शिवाय प्रचंड वर्दळीच्या या रस्त्यांवर फक्त एकच कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. ती तुडुंब भरून वाहते तसेच अनेक जागी कचर्‍याचे ढिगारे पडून असतात. याकडे बीड नगर परिषद चे स्वच्छता विभाग अक्षम्य असे दुर्लक्ष करत आहे. मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी जुने एस.पी. ऑफिस आणि पोलीस उद्यानाच्या भिंतींवर पक्षी, प्राणी झाडी वगैरे पेंटिंग च्या माध्यमातून रंगरंगोटी करून घेतली. यामुळे या रस्त्यावर शोभा वाढली आहे. मात्र दुसरीकडे झाडांविना असलेले रिकामे खड्डे व नेहमी तुडूंब भरलेली कचराकुंडी व जागोजागी पडलेल्या कचर्‍याच्या ढिगार्यांवरही काम व्हायला हवे म्हणजे रस्त्यावरील शोभा द्विगुणीत होईल. असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS