मनपा कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनलचा डंका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनलचा डंका

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थेवर सहकार पॅनेलने डंका वाजवला. या पॅनेलने प्रतिस्पर्धी जनसेवा पॅनेलचा दारूण पराभव केला. या निका

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले अण्णा हजारेंच्या भेटीला…
मनपा अभियंता निकम यांना अशोक भूषण पुरस्कार जाहीर
डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थेवर सहकार पॅनेलने डंका वाजवला. या पॅनेलने प्रतिस्पर्धी जनसेवा पॅनेलचा दारूण पराभव केला. या निकालानंतर सहकार पॅनेल समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. मनपा कर्मचारी पतसंस्थेवर मागील 25 वर्ष जनसेवा पॅनलची सत्ता होती. मात्र, यावेळी सहकार पॅनलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल व मार्गदर्शक जितेंद्र सारसर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली व त्यानंतर लगेच मतमोजणी प्रक्रिया देखील झाली. या निकालामध्ये सहकार पॅनलच्या पंधरा उमेदवारांनी जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना पराभूत केले व विजयावर शिक्कामोर्तब केले. विजयी उमेदवार असे – बाबासाहेब मुदगल, विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गीते, कैलास चावरे, सतीश ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब धंगेकर या सर्व उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी विजय मिळवला. निवडणूक निकाल लागल्यावर सहकार पॅनेलच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

COMMENTS