Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुक्यात वादळी वार्‍यामुळे नुकसान

मसूर / वार्ताहर : सोमवारी सायंकाळी मसूर परिसरात झालेल्या वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने हेळगांव, कालगांव परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडली तर व

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ
बायोसीड कंपनीचे शहंशाह मका वाण लावा आणि उत्पन्न वाढवा
शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; ‘असे’ होणार मदतीचे वाटप

मसूर / वार्ताहर : सोमवारी सायंकाळी मसूर परिसरात झालेल्या वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने हेळगांव, कालगांव परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडली तर विजेचे खांब मोडून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र, वळवाच्या पावसाने सर्वांचे दाणादाण उडवून दिली.
यादिवशी अचानक सुटलेल्या वादळी वार्‍याचे चक्रीवादळात रुपांतर होवून श्री समर्थ हायस्कूल कालगांव या विद्यालयाच्या दोन वर्गावरील पत्रा उडून शाळेच्या मैदानावर व शेजारी असलेल्या उसात पडला. त्यामुळे शाळेतील साहित्य भीजले. तसेच विद्यालयाच्या शेजारी असलेला विजेचा खांब मोडून पडला. खराडे ते बेलवाडी दरम्यान तारगांव रस्त्यावर दोन मोठी बाभळीची झाडे पडली. तसेच कालगांव रेल्वे गेट ते नवीन गावठान दरम्यान रस्त्यावर पाच झाडे पडली. या ठिकठिकाणी पडलेल्या झाडांमुळे या मार्गावरील वहातूक सुमारे चार तास ठप्प झाली होती. रस्त्यावरील झाडे स्थानीक नागरिकांनी हटवल्यानंतर वहातूक हळूहळू पुर्ववत होण्यास मदत झाली.
तसेच हेळगांव चिंचणी मार्गावरही झाडे पडल्याने या मार्गावरील बराच काळ वहातूक ठप्प होती. उभे असणारे उसाचे पीकही आडवे झाले असल्याचे दिसत आहे. गेली दोन चार दिवस तीव्र उस्माने हैराण झालेल्या जनतेला वळवाच्या पावसाने दिलेला शिडकावा गारवा देऊन गेला. तद्नंतर या दोन दिवसभरात तीव्र उन्हाच्या उकाड्याने जनता सैरभैर झाली आहे. अनेकजण दिसेल त्या गारव्याला विश्रांती घेताना दिसत आहेत.

COMMENTS