Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करपडी फाटा ते बाभूळगाव दुमाला रस्त्याची दैना

नेत्यांची मात्र गुपचिळी

कर्जत : कर्जत तालुक्यातील करपडी फाटा ते बाभुळगाव दुमाला या 8 किलोमीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. मागील काही वर्षात या रस्त्याचे दोन वेळ

श्रीगोंदा तालुका योग संघाच्या अध्यक्षपदी गोविंद हिरवे
स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन
प्रा. डॉ. विजय देशमुख यांना राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक  पुरस्कार

कर्जत : कर्जत तालुक्यातील करपडी फाटा ते बाभुळगाव दुमाला या 8 किलोमीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. मागील काही वर्षात या रस्त्याचे दोन वेळा नव्याने काम झाले मात्र रस्त्याची स्थिती जैसे थे आहे. रस्त्यावरील खड्डे आणि भेगा यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
राज्य महामार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने यावरून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. दूध उत्पादक शेतकरी, शाळकरी मुले, बाजारकरु व इतर नागरिकांचे या रस्त्यावरून ये-जा सुरू असते. अवजड वाहनांची वाहतूक व मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी यामुळे या मार्गावर छोटे मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. करपडी, मानेवाडी, शिंपोरा, बाभुळगाव या चार गावांना वापरात येणारा हा रस्ता कायम खड्डेमय असतो. ही भीमा नदीपात्रावरील बागायती गावे असल्यामुळे ऊस आणि इतर शेतमालाची वाहतूक जास्त प्रमाणात असते. या रस्त्याने ये- जा करणारे स्वयंघोषित पुढारी, समाजसेक, नेते मात्र नागरिकांच्या या प्रश्‍नावर मुग गिळून बसलेले दिसत असल्याने हा प्रश्‍न अधिकाधिक गंभीर होताना दिसत आहे.

COMMENTS