लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये कला शाखेत द्वितीय वर्षासाठी शिकत असलेल्या पायल इंद्रजीतजाधव या विद्यार
लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये कला शाखेत द्वितीय वर्षासाठी शिकत असलेल्या पायल इंद्रजीत
जाधव या विद्यार्थिनीने कराड येथे गाडगे महाराज महाविद्यालयात झालेल्या 57 किलो वजन गटातील तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण असेच यश मिळविलेले आहे. यामध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. या यशाबद्दल पायल जाधव हिचे अभिनंदन होत आहे. पायलच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांच्यासह शालेय प्रशासन, तिचे कुटुंबिय व नागरिकांनी अभिनंदन केलेले आहे. पायल हिला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले.
या अगोदरच काही दिवसांपूर्वी पायल जाधव हिने चंदीगड येथे झालेल्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. आज पुन्हा एकदा कराडच्या मातीत पायल हिने यशाला गवसणी घातली आहे. संत गाडगे महाराज महाविद्यालयात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विद्या पाटील, प्रा. किशोर संकपाळ, प्रा. विक्रम ननावरे, प्रा. शिवराज गायकवाड, प्रा. साबळे, प्रा. उदय शिंदे, प्रा. ओंकार जंगम, प्रा. स्मिता जगताप उपस्थित होते. ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पायल हिने मागच्या वर्षापासून तयारी सुरू केली होती. येत्या 17 फेब्रुवारी रोजी आंतर विभागीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे पायल हिने सांगितले आहे. स्पर्धेची रेफरी म्हणून सुधीर लोहार, अमोल सावंत, प्रदीप जाधव, सुमित भंडलकर, हणमंत भोसले, अकबर शेख, इम्रान खान, विजय मस्के, सचिन साळुंखे, अक्षय खेटमर यांनी कामकाज पाहिले.
COMMENTS