मुंबई येथे समाजवादी चळवळीने आयोजित केलेल्या 'संविधान निर्धार सभे'ला मार्गदर्शन करताना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय चिंतनशील विचारांची मांडणी
मुंबई येथे समाजवादी चळवळीने आयोजित केलेल्या ‘संविधान निर्धार सभे’ला मार्गदर्शन करताना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय चिंतनशील विचारांची मांडणी केली. त्यांच्या मते, देशामध्ये समाजवादी, कम्युनिस्ट आणि वेगळ्या विचारांच्या चळवळी सशक्त होत्या. परंतु, आज त्यांचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. जो काही उरलासुरला भाग आहे तो मोडका तोडका आहे. एरवी चळवळी संपुष्टात आल्या आहेत. याची कारणमिमांसा करताना, त्यांनी चळवळींच्या एकूणच आकलनावर विचार केंद्रित केले. भारतीय समाज हा एक प्रकारे पुरातन विचारांवर चालणारा असताना, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये निर्माण झालेल्या संविधानाने पुरातन संस्कृतीला त्याज्य ठरवले. परंतु , विज्ञानवादी या संविधानांच्या. संस्कृतीला रुजवण्यामध्ये समाजवादी, डाव्या चळवळी या सक्षम ठरल्या नाहीत. त्यांनी संविधानाला समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं नाही. त्यामुळे या चळवळीकडे आकर्षित न होणारा युवक हा नव्या विचारांकडे आकर्षित होणार होता. परंतु, तो नवा विचार या देशातील पुरातन संस्कृतीचा आणि वैदिक विचारांचा होता. त्यामुळे या पोकळीमध्ये तरुणांना आकर्षण निर्माण करण्याचं काम या विचाराने केलं. आज आपण संविधान बचाव पर्यंतच्या टप्प्यावर येऊन ठेपलो आहोत. अजूनही तसे पाहता वेळ गेली नाही; असे सांगत, त्यांनी राजकारणात एक विरुद्ध एक असा उमेदवार देण्याची चर्चा लोकांमध्ये होत असली तरी, त्यांनी या चर्चेवर प्रश्नचिन्ह उभं करत म्हटले की, देशातील सर्वच राजकीय पक्ष एकत्र येतील याची मला खात्री नाही. परंतु, ते जर एकत्र आले आणि एकास एक अशी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला तर, एखादा पुलवामा सारखे प्रकरण घडले आणि पुन्हा अशा गोष्टी करणाऱ्या शक्तींचा निपात करण्यासाठी आम्हाला पुन्हा एक संधी द्या, असं आव्हान केलं जाऊ शकतं. त्या आव्हानांमध्ये आमची फसगत होऊ शकते. ती जर व्हायची नसेल तर आम्हाला निवडणुका एकास एक उमेदवार म्हणून लढवायच्या नाहीत, तर विचारांची लढाई आणि त्या ठिकाणी त्या त्या विचारांच्या म्हणजे संविधानाच्या समर्थनात असलेल्या विचारांच्या राजकीय पक्षाला आणि उमेदवाराला निवडून आणण्याची खरी गरज आहे. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर, संविधान बदलण्याची घाई ज्या शक्तींना झाली आहे, त्या शक्तींना बहुमतापर्यंत पोहोचवण्यापासून रोखणे हे मोठे आणि पहिले आव्हान आहे. आपण या २०२४ च्या निवडणुकीत हे आव्हान पेलू शकलो तर, संविधान वाचवण्याचा लढा आम्हाला यशस्वी करता येईल. यापूर्वी संविधान मेंळाव्यात बाळासाहेबांनी शिवाजी पार्क च्या सभेत मांडणी केली. त्याचा अर्थ आता कोणताही विचार, समाजाच्या संघर्षातून पुढे येतो आहे. म्हणून वैदिक समांतर असणारे संतवाणी समांतर रचना या संघर्षात जे संतवाणी समाज रचनेच्या बाजूने येतील तेच संविधान वाचवू शकतात. कारण, संविधान हे या देशातल्या संतांच्या विचारांवर आधारित आहे. अशा शब्दात त्यांनी मांडणी केली. याचा अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीच्या विचारांचे बिगुल त्यांनी वाजवले, असे म्हणण्यास हरकत नाहीं! यापूर्वीही त्यांनी शिवाजी पार्क मैदानावर देखील त्यांनी हेच म्हटले. आगामी लोकसभा निवडणुकीचा हा वैचारिक संघर्ष आणि त्याचा अजेंडा त्यांनी आता स्पष्टपणे मांडला आहे. आणि हीच बहुदा सर्वच राजकीय पक्षांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भूमिका राहील, यात शंका असल्याचे कारण नाही.
COMMENTS